अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण महासंघाचे विद्यमाने मुंबई विभागीय चित्पावन ब्राह्मण महासंमेलन
प्रिय चित्पावन बंधूभगिनी,
स. न. वि. वि.
कळविण्यास आनंद वाटतो की, मुंबई विभागातील अकरा चित्पावन संस्थांचे वतीने चारकोप – कांदिवली ते मुंबई तसेच ठाणे ते कर्जत – खोपोली – टिटवाळा व नवी मुंबई परिसरातील सर्व चित्पावन बांधवांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे.
मुंबई विभागामध्ये असे महासंमेलन प्रथमच होणार असून आपल्या अनेकांच्या उपस्थितीमुळे ते भव्य व रंगतदार होणार आहे.
सकाळी ०८:३० ते सायंकाळी ०६:०० या वेळेमध्ये दर्जेदार कार्यक्रम आणि महिलांसाठी, युवा व उद्योजकांसाठी तसेच जेष्ठ नागरिकांसह सर्वसमावेशक अशा तीन सत्रांचे आयोजन केले आहे.
या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार असून गुणीजनांचा सत्कार आणि ‘चित्पावन भूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता श्री. सुबोध भावे व विघ्नेश जोशी आणि महेश काळे व सहकलाकलाकारांचे करमणुकीचे विशेष कार्यक्रमही सदर केला जाणार आहे.