म्हणे, “सिंहस्थ कुंभमेळ्यात धर्मांतराचा घाट” आजच्या लोकसत्त्ताची प्रमुख बातमी.
यात घाट घालण्यासारखं काय आहे? बातमीच पुढे म्हणते, “हिंदु धर्मियांच्या प्रमुख उत्सवांपैकी एक”. म्हणजे हा या हिंदुराष्ट्रातील (होय, हिंदुंचे राष्ट्र, निधर्मींचे नव्हे वा सर्वधर्मसमभावाचे थोतांडही नव्हे) हिंदुंचा पवित्र धार्मिक सण असताना वेगळा घाट घालण्याचे प्रयोजन नाही. बरं, धर्मांतरच म्हणायचे तर मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मीय तर राजरोस करतायत त्यांचेबद्दल अशी घाट घालणारी बातमी लोकसत्तेनी यापूर्वी कधी बर दिली आहे? मग त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांनी तर हा उपक्रम उघडपणे मांडलाय यावर पत्रकारितेचा आक्षेप कशासाठी ?