Chitpavan Brahman Sangh, Mulund is organising hindu spiritual & social events since it’s formation day & before just to unite chitpavan kokanastha brahmans to form social group to increase communication & transformation in to one unite. Chitpavan Sangha has organised many events in to such a direction. We tried to write down all of our information to be documented in this blog post to for reference of other chitpavan kokanstha brahmans to know what type of help & facilities are available from Chitpavan Sangha.
I would adive everybody from chitpavan kokanstha brahman cast to take note of following writeup & do take positive advantage of Chitpavan Sangha Schemes & facility.
I would also advice everybody from chitpavan kokanstha brahman cast to register to nearest Chitpavan Brahman Sanghas’ or Chitpavan Brahman Sangha, Mulund to receive registered mailers with updates & future event details with date & time.
(Mandar Apte)
Here is report / essay written by Mr. Anil Risbood in Marathi about Chitpavan (Kokanastha) Brahman Sangha, Mulund (East) & It’s Working Information, Weekly – Monthly – Yearly Activities, Students’ Educational Help & Scholarships & Foundation of Sangha Information etc.
चित्तपावन ब्राह्मण संघ, मुलुंड (रजि)
पत्ता: २०४, गणेश भुवन, महात्मा फुले मार्ग, मुलुंड (पूर्व), मुंबई – ४०० ०८१
दूरध्वनी: +९१ (०२२) २५६३०४७२
चित्तपावन ब्राह्मण संघाची स्थापना दिनांक ४ मे १९९२ अक्षय्यतृतीयेला परशुराम जयंतीच्या दिवशी झाली. सदर संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे तसेच विश्वस्त व्यवस्था कार्यालयात १९९३ साली नोंदणी करण्यात आली. सुरवातीला संस्थेच्याकार्यासाठी संस्थेची स्वतःची जागा नव्हती त्यामुळे संस्थेची सर्व कागदपत्रे सचिवांच्या घरी ठेवली जात. सर्व पत्रव्यवहारही साचीवान्च्यापात्यावर होई. सुरवातीला दर गुरुवारी रात्री पंडित सभागृहात सभा होत असे. संथेची स्वतःची वस्तू असावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु निधी अभावी ते शक्य दिसत नव्हते. त्यामुळे संस्थेने आपल्या सभासदांना या कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले. या आवाहनाला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला आणि द्यान्तीतील दानशूर व्यक्तींना उदार हस्ते दिलेल्या मदतीमुळे संस्थेची वरील पत्यावर वस्तू उभी राहिली. व्यावसायिक वापर दिनांक ५ डिसेंबर २००३ पासून सुरु झाला.
संस्थेची हि स्वतःची वस्तू उभी करण्यात श्री अप्पा देवधर आणि श्री म. ब. देवधर यांच्या बहुमोल योगादाबद्दल संस्था त्यांची सद्दैव ऋणी राहील.
संस्थेचे सभागृह १००० चौरस फुटाचे असून याशिवाय एक खोली व थोडी मोकळी जागा, त्याच प्रमाणे एक स्वयंपाकाची खोली असे एकूण १५०० चौरस फुटाचे क्षेत्र वापरण्यासाठी मिळते.
साधारणपणे १०० ते १२० माणसांचा कार्यक्रम येथे होऊ शकतो वर्षभरामध्ये साधारण १४० दिवस या सभागृहाचे आरक्षण होते. अशा आरक्षणासाठी संस्थेचे कार्यालय रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळात उघडे असते.
संस्थेचे सभागृह ६ महिने अगोदर आरक्षित केले जाते.
उपलब्धतेनुसार सभागृह रात्रौ १० ते ७ वाजेपर्यंत मिळू शकते.
सभागृह आरक्षण तक्ता
पूर्ण दिवस
वापराचा कालावधी: सकाळी ०७:३० ते रात्री ०९:३०
आरक्षण आकार: रुपये ६,०००/- फक्त
अनामत रक्कम: रुपये १,०००/- फक्त
अर्धा दिवस
वापराचा कालावधी: सकाळी ०७:३० ते दुपारी ०२:०० किंवा दुपारी ०३:०० ते रात्री ०९:३०
आरक्षण आकार: रुपये ४,०००/- फक्त
अनामत रक्कम: रुपये १,०००/- फक्त
अनामत रक्कम कार्यक्रम झाल्यापासून १५ दिवसांनंतर धनादेशाद्वारे परत करण्यात येते. संस्थेच्या कार्यासंबंधी कुणाला काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांचे स्वागत आहे.
कार्यालयाची वेळ: सांयकाळी ०६:०० ते ०८:००
या दूरध्वनीवर संपर्क साधावा: +९१ (०२२) २५६३०४७२ / कॅटरर्स श्री. आपटे, श्री कुलकर्णी.
संस्थेच्या सभासदांची संख्या ३१.३.२०१२ पर्यंत –
आधारस्तंभ – १०५, आजीव – ८६९, एकूण ९७४ सभासद
संस्थची कार्यकारणी – अध्यक्ष – उपाध्यक्ष, सचिव – सहसचिव, खजिनदार – सहखजिनदार व १२ सभासद तसेच ३ स्वीकृत सभासद. याशिवाय संस्थेचे विश्वस्त संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. महिला विभाग व कट्टा विभाग असे दोन विभाग आहेत.
वधुवर सूचक केंद्र – दर शनिवारी / रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत चालविले जाते. ब्राह्मणांच्या चारही शाखांतील वधुवरांची यादी पहावयास मिळते, याशिवाय पार्ले, डोंबिवली, गिरगांव, बिबवेवाडी – कात्रज परिसर पुणे संघातील स्थळे पहावयास मिळतात.
संस्थेचे एक सभासद श्री. रमाकांत गोखले यांनी रुपये ३,०१,००१/- ची देणगी दिली आहे. त्यांच्या इच्येप्रमाणे सदर देणगीवरील व्याजाचा विनियोग ज्ञातीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना “कु. अपर्णा गोखले” यांच्या नांवाने शैक्षणिक मदत दिली जाते.
सभासदांनी दिलेल्या देणग्यांतून संस्थेने “शिक्षण निधी” स्थापन केला. असून त्यातून ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती, १० वी व १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या मुलांना / नातवंडाना बक्शिशे देण्यात येतात. तसेच संबंधित वर्षात वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्यांच्या संस्थेतर्फे सत्कार करण्यात येतो. तसेच वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञाती बांधवांचा सत्कार केला जातो.
१) संस्थेने मागील वर्षापासून सभासदांना वैद्यकीय मदत देण्याचे सुरु केले आहे.
२) संस्थेतर्फे – वर्धापन दिन (परशुराम जयंती) वार्षिक स्नेहसंमेलन तसेच सर्वांसाठी खुली असलेली “वसंत व्याख्यानमाला” कोजागिरी पोर्णिमा तसेच माघी जयंती निमित्त गणेशयाग दरवर्षी आयोजित केला जातो.
३) महिला विभागातर्फे अनेक कार्यक्रम जसे महिला दिन, महाकवी – कालिदास दिन, महिला विभाग वर्धापन दिन आनंद मेळावा (ग्राहक पेठ), तिळगुळ समारंभ आयोजित केले जातात.
या सर्व कार्यक्रम आयोजनात काट्याचा सहभाग असतो.
भविष्यातील उपक्रम –
१) चित्तपावन व्यावसायिक मंच (सूची करण्याचे काम चालू आहे.)
२) संस्थेचे ४ पाणी मुखपत्र
संस्थेची हि स्वतःची वस्तू उभी राहण्यात ज्या दानशूर सभासदांचे बहुमोल योगदान लाभले, त्या सर्वांची संस्था कायम ऋणी राहील.
नोंद: ह्या वर्षीचा गणेश याग हा २१ व्या वर्षीचा होता. म्हणजेच असे मागील २० वर्ष गणेश याग चित्तपावन संघ, मुलुंड ह्यांस कडून करण्यात आलेले आहेत. नोंद असावी.
श्री अनिल रिसबूड
अध्यक्ष