अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण महासंघाचे विद्यमाने मुंबई विभागीय चित्पावन ब्राह्मण महासंमेलन

अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण महासंघाचे विद्यमाने मुंबई विभागीय चित्पावन ब्राह्मण महासंमेलन

प्रिय चित्पावन बंधूभगिनी,
स. न. वि. वि.

कळविण्यास आनंद वाटतो की, मुंबई विभागातील अकरा चित्पावन संस्थांचे वतीने चारकोप – कांदिवली ते मुंबई तसेच ठाणे ते कर्जत – खोपोली – टिटवाळा व नवी मुंबई परिसरातील सर्व चित्पावन बांधवांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे.

मुंबई विभागामध्ये असे महासंमेलन प्रथमच होणार असून आपल्या अनेकांच्या उपस्थितीमुळे ते भव्य व रंगतदार होणार आहे.

सकाळी ०८:३० ते सायंकाळी ०६:०० या वेळेमध्ये दर्जेदार कार्यक्रम आणि महिलांसाठी, युवा व उद्योजकांसाठी तसेच जेष्ठ नागरिकांसह सर्वसमावेशक अशा तीन सत्रांचे आयोजन केले आहे.

या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार असून गुणीजनांचा सत्कार आणि ‘चित्पावन भूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता श्री. सुबोध भावे व विघ्नेश जोशी आणि महेश काळे व सहकलाकलाकारांचे करमणुकीचे विशेष कार्यक्रमही सदर केला जाणार आहे.

स्वागोतोत्सुक: माधव घुले, अजित गानू, मिलिंद जोशी, राजेश गोडबोले, विश्वास दीक्षित, विनायक मालशे, सौ. वृंदा पटवर्धन

स्थळ: विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. बेडेकर महाविद्यालय संकुल, ठाणे (प.)

दिवस: रविवार, १७ जानेवारी २०१६

वेळ: सकाळ ०८:३० ते सायंकाळी ०६:००

संपर्क: श्री. माधव घुले – ०९५९४९९६६४६, श्री अजित गानू – ०९१६७३२१६६४

देणगी प्रवेशिका रु. ३००/- प्रत्येकी

धन्यवाद.

Join the Conversation

1 Comment

 1. सप्रेम नमस्कार,
  मी, दीपक परांजपे (रा.पुणे) सन २००८ पासून आयुर्वेद शास्त्रानुसार विविध बहुगुणी “औषधी वनस्पतीं” या विषयी माझ्या सहकारी डॉ. शीतल चोपडे यांच्या मदतीने प्रदर्शन आयोजित करणे / सविस्तर माहितीसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, तयार रोपांच्या विक्री करणे इ. द्वारा “औषधी वनस्पतींचा प्रचार व प्रसार” संबंधी काम करीत आहे.

  विविध ग्रंथ अथवा पुस्तकातून औषधी वनस्पतींची माहिती घेताना वेद / पुराण काळापासून आपल्या धर्मशास्त्रात उल्लेख असलेल्या नक्षत्र वृक्ष व गणेशपत्री (२१ पत्री) बाबत माहिती वाचनात आली, मानवास या बहुगुणी व अत्यंत उपयोगी दिव्य वनस्पतींची ओळख व्हावी व त्यांची सविस्तर माहिती मिळावी हाच बहुदा या दोन्ही प्रथांचा मुख्य उद्देश असावा असे वाटते.

  गणेशोत्सवाचा विचारकरता पारंपारिक प्रथेनुसार गणेशाचे पूजन करताना गणेशपत्री देवास अर्पण कराव्यात असे मानले जाते, पण आजच्या तरुण पिढीस या बाबत फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही. परंतु, कोणी त्यांना या विषयी मार्गदर्शन केल्यास प्रत्येक घरातील त्या विनायकाचे पूजन अधिक मंगलमय होईल हे निश्चित…….
  याच उद्देशाने सन २०१० पासून आम्ही गणेशपत्री (२१ पत्री) हा उपक्रम पुणे परिसरात तसेच मागील वर्ष्यापासून दादर येथील “फेमिली स्टोअर्स” येथे यशस्वीरित्या राबवत आहोत.
  सदर गणेशपत्री एका प्लास्टिक बॉक्समध्ये योग्य क्रमाने भरल्या जातात. उदा. सर्वात वरती मालतीपत्र (मधुमालती) असते, तर सर्वात शेवटी अगस्ती (हदगा) चे पान असते. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक पत्री अर्पण करताना त्या गणाधिषाचे नामस्मरण व्हावे यासाठी प्रत्येक पत्रीचा एक विशिष्ठ मंत्र सांगितला आहे. या २१ पत्रींसोबत मंत्रांची माहितीही सोबत जोडलेली असते.

  आपल्या “चित्तपावन कट्टा” या मंचाद्वारे मुंबई परिसरातील सर्व चित्तपावन सभासदांना या उपक्रमाची माहिती व्हावी याच उद्देशाने हि e-mail आपणास पाठवत आहे.

  कळावे,
  आपला विनम्र,
  दीपक दिनकर परांजपे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *