On Auspicious day of Maghi Ganesh Chaturhty Chitpavan Brahman Sangh organised Ganesh yag on same day, Here is report & notes…
Watch Video Documentation of Same:
Essay Written about the same in Marathi by Shri Ghangarekar:
माघ शुद्ध तृतीया युक्त चतुर्थी अर्थात माघी चतुर्थी – गणेश जन्माचा दिवस या वर्षी बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ रोजी आली होती. त्या दिवशी सालाबादप्रमाणे चित्तपावन ब्राह्मण संघ, मुलुंड (पूर्व) येथे व गणेशयाग संपन्न झाला. सकाळी ०७:३० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल रिसबूड आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले, त्यावेळी अभिषेकाचे वेळी ब्रह्मणस्पती सुक्त व गणपती अथर्वशीर्ष पठाण करण्यात आले. त्यानंतर गणेशयागाला सुरवात झाली. गणपती अथर्वशीर्ष पठणासाठी एकूण बारा ब्राह्मण उपस्थित होते. प्रत्येक अथर्वशीर्षाच्या शेवटी सहा ब्राह्मण आणि सहा सुवासिनी मिळून मोदकाच्या बारा आहुती आणि दोन ब्राह्मणांच्या हस्ते तुपाची एक / एक आहुती देण्यात आली. दुपारी ठीक बारा वाजता सदर गणेश याग पूर्ण झाला. त्यानंतर उपस्थितांना भोजनाचा प्रसाद देण्यात आला. संपूर्ण गणेश यागाला श्री आप्पा देवधर यांचे मार्गदर्शन आणि श्री रमाकांत गोखले यांचे पौरोहित्य लाभले.
अशाप्रकारे त्यादिवशीचा गणेशयाग संपन्न झाला.
Thanks & Regards
Mandar Apte
Hi,I have seen the video,good to see chitpavans are getting together.
A very good effort to find & unite the chitpavans.I am also a chitpavan,
Hi Vivek,
Thanks for comment & thoughts,
Where you live? Do send your details on my email ID mentioned on contact page of this website.
So that we can build our community…
Thanks & Regards
Mandar Apte