Mulund Chitpavan Sangh’s Visit to Burondi to see Parshuram’s Statue Near Dapoli

Here is the easy about journey of Burondi, Written in Marathi by Vaishali Vishnu Ghangarekar.

 
(Visit was organised by Mulund Chitpavan Sangh)

 
IMG_0095

 
 An Essay in Marathi by one of the visitor, Mrs. Vaishali Vishnu Ghangarekar:

 
आम्ही ‘बुरोंडी’ ला निघालो. श्री अनिल व सौ अश्विनी गानू या दोघांनी एक शिवधनुष्य पेलून दाखवले. दापोलीपासून १० कि.मी अंतरावर बुरोंडी गावी रम्य परिसरातील एक टेकडीवर ४० कि.मी. व्यासाच्या पृठीविवर एक २० फूटी परशुरामाचा पुतळा उभा केला. या त्यांच्या कार्याला आमचा आधी सलाम!

 
हा परशुरामाचा पुतळा खरोखरच अप्रतिम आहेच पण बाजूचा परिसर इतका रम्य आहे कि या दोन्ही गोष्टींकडे आपण पाहताच राहतो. आम्ही अक्षरश: आवक झलो!

 
लांबवर पसरलेला समुद्र! समोर खुणावणारे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारा वर आणि वरती निळे निळे चमकणारे आकाश. या पार्श्वभूमीवर एका टेकडीवर उभी केली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर उभा आहे आपला सर्वांचे श्रद्धास्थान असलेला परशुराम!

 
हा पुतळा फारच सुंदर आहे तशीच पृथ्वीही आपल्याला आकर्षित करते. हा पुतळा लांबून पहिला जवळ जाऊन पहिला तरी आपल्या मनाचे समाधान होत नाही. आपण स्वत:ला विसरून याचा आनंद घेतो. ‘मी’ पण गळून पडतो. स्वत:ला कोणीतरी ‘श्रेष्ठ’ आहोत असे समजणारे आपण किती अणु सारखे आहोत याची जाणीव होत राहते.

 
अजून बाजूच्या परिसरात ‘Optic Garden’ बनवण्याचे काम चालू आहे. रस्ता घसरडा आहे. पण आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही. पडलो तरी परशुरामाच्या पायाशीच ना! या कशाकडे आपले लक्ष नसते हे काही आपल्याला दिसताच नाही फक्त दिसत असतो परशुराम!

 
पृथ्वी ला दारे केल्यामुळे आत जाता येते आत गेल्यावर सुखद गारवा आनिघुमाणारा आपला आवाज या कौतुकात आपण दंग होतो. अजून पृथ्वूच्या आतल्या बाजूला तारांगण होणार आहे.

 
परशुरामाचा पुतळा पाहून झाल्यावर धन्य झाल्यासारखे वाटते! आणि एक गोष्ट मात्र पटते कि या गानू दांपत्याचे आभार मानायला शब्द अगदी तोकडे होऊन जातात म्हणून त्यांच्या या कार्यासाठी त्यांना खूपखूप शुभेच्या व धन्यवाद!

 
वैशाली विष्णू घांगरेकर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *