म्हणे, “सिंहस्थ कुंभमेळ्यात धर्मांतराचा घाट” आजच्या लोकसत्त्ताची प्रमुख बातमी.
यात घाट घालण्यासारखं काय आहे? बातमीच पुढे म्हणते, “हिंदु धर्मियांच्या प्रमुख उत्सवांपैकी एक”. म्हणजे हा या हिंदुराष्ट्रातील (होय, हिंदुंचे राष्ट्र, निधर्मींचे नव्हे वा सर्वधर्मसमभावाचे थोतांडही नव्हे) हिंदुंचा पवित्र धार्मिक सण असताना वेगळा घाट घालण्याचे प्रयोजन नाही. बरं, धर्मांतरच म्हणायचे तर मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मीय तर राजरोस करतायत त्यांचेबद्दल अशी घाट घालणारी बातमी लोकसत्तेनी यापूर्वी कधी बर दिली आहे? मग त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांनी तर हा उपक्रम उघडपणे मांडलाय यावर पत्रकारितेचा आक्षेप कशासाठी ?
बरं , कुंभमेळा नेहमीच होत आलाय आणि त्याद्वारे यापूर्वी हा उपक्रम कोणी राबवला नसेलच असेही नाही, मग आताच हा ओरडा कशासाठी ? त्यातही हा काही भाजपचा जाहीरनामा नाही की कोणाचे सेमिनार वा शिखर परिषदही नाही. हा तर एक धर्माधिष्ठित सोहळा आहे.
काश्मिरात आजही भारताचा राष्ट्रध्वज उघडपणे जाळला जातो, ओवेसी वा इमाम आगखाऊ भाषण करीत उघडपणे फिरतात त्याविरूध्द लोकसत्तेनी किती वेळा आवाज उठवलाय? की लोकसत्तेची ती हिंमत नाही?
असली डरपोक आणि एकतर्फी बातमी देणं हीच का तुमची निष्पक्ष पत्रकारिता?
बंधूंनो, जागे व्हां, असल्या बातम्यांचा प्रतिवाद करा.
माधव घुले